which is going to test whether SVS will survive or not.Issue is very big and community is very small and at it's start stage.
दिनांक ५ जुलै व ६ जुलै २००९ च्या जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांत झळकलेल्या बातमीनुसार वसई-विरार महानगरपलिकेची अधिसूचना दबक्या आवाजात जारी करण्यात आली आहे. वसई तालुक्यातील ५३ पैकी ४८ ग्रामपंचायतिने महानगरपालिके विरोधात ठराव मांडूनही महाराष्ट्र सरकारने ही महानगरपालिका जबरदस्तीने लादन्याचा प्रयत्न चालविला आहे. मुठभर बिल्डर व राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून लाखो सामवेदी, ख्रिस्ती, कोळी, आगरी, पानमाळी, मुस्लिम इ. समाज्याचा व निसर्गरम्य अशा वसईचा नायनाट करण्याच्या ह्या कृतिस वसईतिल सर्व तरुण वर्गाने स्थापन केलेल्या "स्वाभिमानी संघटनेच्या" माध्यमातून जाहिर निषेध नोंदवत आहे.
मागील काही महिन्यापासून महानगरपालिका ह्याच विषयावर आगाशी, नंदाखाल, नाला, भुइगांव, मुळगाव् ह्या ठिकाणी ३-४ सभा घेण्यात आल्या. वसईतिल २५ ते ४० वयोगटातील १५० तरुणांनी एकत्र येवून वसईकरांच्या मुलावर उठलेल्या महानगरपालिका ह्या विषयावर चर्चा संवाद घडवून पूर्ण ताकदीने ह्या निर्णया विरुध्ह लढण्याचा ठाम निर्धार "स्वाभिमानी संघटनेने" घेतला आहे. सर्व नागरिकानी एकत्र येवून आपआपल्या विभागातील ग्रामपंचायतिद्वारे पुन्हा एकदा विरोधाचा ठराव पारित करून सामाजिक चळवळ उभारून वसईचे अस्तित्व वाचवन्यासाठी कामाला लागावे असे आवाहन स्वाभिमानी संघटनेद्वारे करण्यात येत आहे.
भविष्यात ह्याच विषयावर कदाचित मोठ्या ताकदीने न्यायिक लढाई लढण्यास सर्व युवकांनी सज्ज व्हावे व कोणत्याही प्रकारच्या निसर्ग विरोधी विकासाला वसईत स्थान दिले जाणार नाही असा ठाम निर्धार ह्या संघटनेने घेतला आहे.विजय मच्याडो
अध्यक्ष - स्वाभिमानी वसईकर संघटना.
No comments:
Post a Comment